पोलिसांसाठी देणार ३७ हजार घरे

By admin | Published: March 30, 2017 04:29 AM2017-03-30T04:29:04+5:302017-03-30T04:29:04+5:30

पोलिसांसाठी गेल्या ४० वर्षांत बांधली नाहीत त्यापेक्षा जास्त घरे आपल्या सरकारने दोन वर्षांत बांधली

37 thousand houses to be provided for police | पोलिसांसाठी देणार ३७ हजार घरे

पोलिसांसाठी देणार ३७ हजार घरे

Next

मुंबई : पोलिसांसाठी गेल्या ४० वर्षांत बांधली नाहीत त्यापेक्षा जास्त घरे आपल्या सरकारने दोन वर्षांत बांधली. एकूण ३७ हजार ५४३ घरे पोलिसांना उपलब्ध करुन देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
पोलिसांना स्वत:ची घरे घेता यावीत यासाठी सवलतीच्या दरात कर्जदेखील दिले जाईल. सध्याच्या घरांच्या दुरुस्तीसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
गुन्ह्यांची उकल वेगाने करण्यासाठी सर्व पोलीस ठाणी सीसीटीएनएसच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत. हीच यंत्रणा न्यायालये, तुरुंग यांसाठीही राबविण्यात येणार असून यामुळे कोणत्याही गुन्हेगाराचे एकदा अंगुलीमुद्रा (फिंगरिप्रंट) आणि रेकॉर्ड एका पोलिस ठाण्यात नमूद झाला की दुस-या पोलीस ठाण्यात त्याच्याविरु द्ध गुन्हा नोंदवला गेल्यास तिथेही त्याच्यावरचे गुन्हे लगेच संगणकावर समोर येणार आहेत. यामुळे गुन्ह्यांचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणे सहज शक्य होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

१०० नव्हे ११२
पोलिसांना कॉल करण्यासाठी सध्या १०० क्रमांक डायल करावा लागतो. तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिकेसाठी वेगवेगळे क्रमांक डायल करावे लागतात. त्या ऐवजी एकच म्हणजे ११२ हा क्रमांक डायल करण्याची सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: 37 thousand houses to be provided for police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.