राज्यात ३७ हजार सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:07 AM2021-09-26T04:07:46+5:302021-09-26T04:07:46+5:30

मुंबई - राज्यात शनिवारी ३,७२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत एकूण ६३,६०,७३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली ...

37,000 active patients in the state | राज्यात ३७ हजार सक्रिय रुग्ण

राज्यात ३७ हजार सक्रिय रुग्ण

Next

मुंबई - राज्यात शनिवारी ३,७२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत एकूण ६३,६०,७३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३७,९८४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात ३,२७६ रुग्णांचे निदान झाले असून, ५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७९,९२,०१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.२८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,५९,१२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १,४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४१,११९ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ३८ हजार ८३४ झाली आहे.

Web Title: 37,000 active patients in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.