Join us

मेट्रो कंत्राटदारांनी थकविले पालिकेचे ३७५ कोटी; कंत्राटदारांकडे मालमता कर वसुलीसाठी मनपाचा तगादा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:27 AM

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डच्या भूखंडांचा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी करारनाम्यानुसार संबंधित कंत्राटदारांवर आहे.

मुंबई: आर्थिक वर्षअखेरीमुळे मुंबई महापालिकेने नागरिकांसह खासगी आस्थापना, विविध प्रकल्पांची प्राधिकरणे व कंत्राटदारांकडे मालमता कर वसुलीसाठी तगादा लावला आहे. 

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डच्या भूखंडांचा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी करारनाम्यानुसार संबंधित कंत्राटदारांवर आहे. मात्र, या कंत्राटदारांनी ३७५ कोटी १२ लाख ७८ हजार २३८ रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याने पालिकेने गुरुवारी त्यांना नोटीस बजावली आहे

१) मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणावर मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या मेट्रोच्या कंत्राटदारांनी त्यांच्या कास्टिंग वार्डचा मालमत्ता कर थकविल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासनाने गुरुवारी मेसर्स एचसीसी-एमएमसी, मेसर्स एल अॅण्ड टी स्टेक या चार कंत्राटदारांना मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजाविली आहे.

 २)  त्यात कराचा भरणा मुदतीत न केल्यास या मालमत्तांचा पाणी व वीजपुरवता खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या वर्षीही जप्तीची नोटीस -

१) मालमत्ता करावी वसुली करण्यासाठी पालिकेने गेल्या वर्षीही मुंबई मेट्रोच्या १२ मालमत्तांना आशीची नोटीस बजावली होती.

२) आझादनगर मेट्रो स्थानक डी. एन. नगर मेट्रो स्थानका, वसाँवा मेट्रो स्थानक, एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक, पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक, जे. बी. नगर मेट्रो स्थानक, एअरपोर्ट रोड़ मेट्रो स्थानक, मरोळ मेट्रो स्थानक या आठ स्थानकांचा समावेश होता.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामेट्रोकर