चार विमानांमधून आले ३७५ प्रवासी; परराज्यातून येणाऱ्यांनी प्रवासाचे तिकीट बाळगावे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:40 AM2020-05-26T02:40:45+5:302020-05-26T06:38:53+5:30
राज्यात येणाऱ्या विमान प्रवाशांना राज्य शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
मुंबई : नागपूर विमानतळावर आलेल्या जवळपास ३७५ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून हातावर २५ तारखेचे क्वारंटाईचे शिक्के लावण्यात आले. त्यामुळे नागपुरात आलेल्या प्रवाशांना १४ दिवस घरातच राहावे लागेल. नागपुरातून चार उड्डाणांद्वारे २२१ प्रवासी संबंधित ठिकाणी परतले. विमानात कुठलीही सीट रिक्त ठेवण्यात आली नव्हती, हे विशेष.
डाव्या हातावर स्टॅम्प, १४ दिवस आयसोलेशन
राज्यात येणाºया विमान प्रवाशांना राज्य शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. राज्यशासनाने सोमवारी ही नियमावली जारी केली. त्यानुसार परराज्यातून येणाºया प्रवाशांच्या डाव्या हातावर आता स्टॅम्प असेल. या सर्व प्रवाशांना १४ दिवस घरीच एकांतवासात (आयसोलेशन) राहणे अत्यावश्यक असेल. तसेच सोबत विमान प्रवासाचे तिकीट बाळगावे व ते पोलीसांना दाखविल्याखेरीज विमानतळाकडे सोडले जाणार नाही.
कुठल्याही प्रवाशांना कोरोना नियंत्रण क्षेत्र तसेच हॉटस्पॉट भागात जाता येणार नाही. हातावर स्टॅम्प असताना १४ दिवसांच्या आत ताप, खोकला किंवा श्वसनाशी संबंधित त्रास आढळल्यास त्याची माहिती तात्काळ आरोग्य सेतू अॅपवर द्यायची आहे. ज्या प्रवाशांचे संबंधित विमानतळ असलेल्या जिल्ह्णात किंवा राज्यात अन्यत्र काम आहे व त्यानंतर लगेच परतायचे आहे, अशा सात दिवसांहून कमी कालावधीसाठी वास्तव्यास असलेल्या प्रवाशांना एकांतवासाचा नियम लागू नसेल.