Join us

मुंबईत ३८ हजार ८५९ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ११६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. काल मुंबईत हाच आकडा ...

मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ११६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. काल मुंबईत हाच आकडा १७१७ इतका होता. काल मुंबईत रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली होती. दिवसभरात मात्र बाधित आणि मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुंबईत बुधवारी ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार ८ इतकी झाली आहे. शहर उपनगरात सध्या ३८ हजार ८५९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत बाधित आणि मृतांचा आकडा वाढला असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. बुधवारीही बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत दिवसभरात ४ हजार २९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख २७ हजार ३७३ इतकी झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९२ टक्के इतका आहे. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दरसुद्धा मंदावला आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १७६ दिवसांवर गेला आहे.