प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मनपाच्या ३८० विद्यार्थ्यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 01:21 AM2019-01-26T01:21:19+5:302019-01-26T01:21:29+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे शासनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे शासनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या पथसंचलनात सैन्यदल, पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, फायर ब्रिगेड यांच्यासोबत महापालिकेच्या शाळांमधील ३८० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
यामध्ये १०० स्काउट (विद्यार्थी), १०० गाइड (विद्यार्थिनी) आणि रस्ता सुरक्षा पथकातील ९० विद्यार्थी आणि ९० विद्यार्थिनींचा समावेश आहे. यानुसार, पालिका शाळांमधील १९० विद्यार्थी व १९० विद्यार्थिनींना प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त होणार असून, या पथकात असणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमानुसार अतिरिक्त १० गुण जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी दिली.
सध्या महापालिकेच्या शाळांमधील २८ हजार विद्यार्थी हे आपल्या नियमित शैक्षणिक उपक्रमांसोबतच स्काउट-गाइडच्या उपक्रमात सहभागी होत असतात. महापालिकेच्या शाळांमध्ये रस्ता सुरक्षा दल विषयक उपक्रमाचे १५० पथक कार्यरत असून, या प्रत्येक पथकात ४० विद्यार्थी, विद्यार्थिनी आहेत. यानुसार, रस्ता सुरक्षा दल उपक्रमात महापालिका शाळांमधील ६ हजार विद्यार्थी सहभागी आहेत.