३८५ आधार कार्ड पोस्ट आॅफिसला परत केली, मेघवाडी पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:23 AM2020-09-05T03:23:38+5:302020-09-05T03:23:44+5:30

जोगेश्वरी पूर्वच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या कचरापेटीमध्ये ही आधार कार्ड्स उघड्यावर पडलेली आढळली.

385 Aadhar cards returned to post office, performance of Meghwadi police | ३८५ आधार कार्ड पोस्ट आॅफिसला परत केली, मेघवाडी पोलिसांची कामगिरी

३८५ आधार कार्ड पोस्ट आॅफिसला परत केली, मेघवाडी पोलिसांची कामगिरी

Next

मुंबई : जोगेश्वरीच्या कचरापेटीत गुरुवारी सकाळी आधार कार्ड्सचा मोठा खच पडलेला आढळल्याने खळबळ उडाली होती. मेघवाडी पोलिसांनी ही जवळपास ३८५ आधार कार्ड्स पोस्ट आॅफिसकडे सुपूर्द केली असून, रजिस्टर्ड आयडी न करण्यात आल्याने हा गोंधळ झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोस्टाकडे सदर काडर््सचा वितरण अहवाल मागविण्यात आला आहे.
जोगेश्वरी पूर्वच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या कचरापेटीमध्ये ही आधार कार्ड्स उघड्यावर पडलेली आढळली. त्यानुसार मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एटीसी विभागाने चौकशी सुरू केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टाकडून सध्या कंत्राटी कुरिअर बॉय नेमण्यात आले आहेत. विविध पत्त्यांवर पोहोचवायची कागदपत्रे हे लोक गोणीत भरून एका ठिकाणी जमा करतात आणि संबंधित विभागात जाऊन पत्त्यावर पोहोचवतात. रजिस्टर आयडी नसल्याने पाण्याच्या अथवा विजेच्या बिलांप्रमाणेच ही कागदपत्रे असल्याचा समज झाल्याने एखादी गोणी हरवून नंतर ती कचरापेटीत फेकण्यात आली.
ही कागदपत्रे पोस्टातून बाहेर काढण्यात आल्याची तारीख पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोस्टातून ती डीसपॅच करणाºया व्यक्तीबाबत आणि एकंदर प्रक्रियेबाबतचा अहवाल पोस्टाकडे मागण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘आम्ही सध्या ३८५ आधार काडर््स ही पोस्टखात्याला सुपूर्द केली असून, पोस्टाकडून डीसपॅच प्रक्रियेचा अहवाल मागितला आहे. त्या अहवालानुसार आम्ही योग्य ती कारवाई करू, असे निगुडकर यांनी सांगितले.
 

Web Title: 385 Aadhar cards returned to post office, performance of Meghwadi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.