मुंबई विमानतळावर २० दिवसात ३८७ टन वैद्यकीय मदत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:06 AM2021-05-20T04:06:22+5:302021-05-20T04:06:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मार्चनंतर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठल्याने भारतात वैद्यकीय साहित्याचा तुटवडा जाणवू लागला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी ...

387 tons of medical aid delivered at Mumbai airport in 20 days | मुंबई विमानतळावर २० दिवसात ३८७ टन वैद्यकीय मदत दाखल

मुंबई विमानतळावर २० दिवसात ३८७ टन वैद्यकीय मदत दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्चनंतर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठल्याने भारतात वैद्यकीय साहित्याचा तुटवडा जाणवू लागला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी शेकडो रुग्णांना जीव गमवावा लागला. भारताला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सध्या देश-विदेशातून मदतीचा ओघ सुरू आहे. गेल्या २० दिवसात मुंबई विमानतळावर विविध देशांतून ३८७ टन वैद्यकीय मदत दाखल झाली आहे.

मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिलपासून विविध २० ठिकाणांवरून ११० विमानांच्या मदतीने ३८७ टन वैद्यकीय सामग्री मुंबईत आणण्यात आली. त्यात १७ हजार ७०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ३ लाख १९ हजार ८०० रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि १ लाख १३ हजार ९०० टोसिलीझुमॅब औषधांचा समावेश आहे.

२६ एप्रिल ते १४ मेपर्यंत सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड, इंडोनेशिया, चीन, स्कॉटलंड, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पोलंड, तुर्की, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, दुबई, थायलँड, कॅलिफोर्निया, हाँगकाँगसह २० देशांतून ही मदत मुंबई विमानतळावर आणण्यात आली. त्यासाठी ११० विमानांचा वापर करण्यात आला. मुंबई विमानतळाने वैद्यकीय सामग्रीच्या साठवणुकीसाठी तापमान नियंत्रण, कोल्ड झोन (शीत विभाग) अशी विशेष यंत्रणा तयार केली आहे.

* १५ मिनिटांच्या आत जकात मंजुरी

सध्या परदेशातून कोविडसंबंधित मदतीचा ओघ वाढला आहे. या अत्यावश्यक साहित्याला जलदगतीने परवानगी देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या कोविडसंबंधित ९५ टक्के सामग्रीची हाताळणी ओळखरहित मूल्यांकन प्रणालीद्वारे केली जाते. वैद्यकीय साहित्याला १५ मिनिटांच्या आत जकात मंजुरी देण्यात येते, अशी माहिती सीमा शुल्क विभागाने दिली.

......

- २६ एप्रिल ते १४ मेदरम्यान ३८७ टन वैद्यकीय मदत दाखल

- ११० विमानांच्या मदतीने २० देशांतून ही मदत मुंबई विमानतळावर आणण्यात आली

- जलद वाहतुकीसाठी १५ मिनिटांच्या आत जकात मंजुरी देण्यात आली

.............................

Web Title: 387 tons of medical aid delivered at Mumbai airport in 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.