३९ दिवसांच्या अर्भकाची आईनेच केली हत्या; १४ व्या मजल्यावरून फेकून दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 09:32 AM2023-09-22T09:32:51+5:302023-09-22T09:33:02+5:30

मुलुंड पश्चिमेकडील नीलकंठ तीर्थ सोसायटीत ही हृदयद्रावक घटना घडली. मनाली लग्नानंतर सुरतला राहण्यास गेली.

39-day-old infant killed by mother; Thrown from the 14th floor | ३९ दिवसांच्या अर्भकाची आईनेच केली हत्या; १४ व्या मजल्यावरून फेकून दिले

३९ दिवसांच्या अर्भकाची आईनेच केली हत्या; १४ व्या मजल्यावरून फेकून दिले

googlenewsNext

मनीषा म्हात्रे

मुंबई : गणेशाच्या आगमनाबरोबरच गौराईच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू असतानाच मुलुंडमध्ये जन्मदात्या निर्दयी मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला १४ व्या मजल्यावरून फेकून दिल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी घडली. अवघ्या ३९ दिवसांच्या अर्भकाचा यात दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी मनाली मेहता या महिलेवर गुन्हा नोंदवला आहे. 

मुलुंड पश्चिमेकडील नीलकंठ तीर्थ सोसायटीत ही हृदयद्रावक घटना घडली. मनाली लग्नानंतर सुरतला राहण्यास गेली. पती-पत्नी दोघेही मूकबधिर आहेत. मुलुंडमध्ये राहणाऱ्या आईकडे मनाली काही दिवसांपूर्वीच राहण्यास आली होती. सकाळी चार ते साडेसहाच्या सुमारास घरातील मंडळी गाढ झोपेत असताना तिने बाळाला खिडकीतून फेकून दिले.  बाळ पहिल्या मजल्यावरील खिडकीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची वर्दी मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, त्यास मृत घोषित करण्यात आले. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे. 

नोकरीसाठी बाळाला रस्त्यावर सोडल्याची घटना भांडुपमध्ये अलीकडेच उघडकीस आली होती. पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध घेत त्यांची पुन्हा भेट घडवून आणली होती.

तणावातून उचलले पाऊल
मनालीचे हे दुसरे बाळ होते. पहिला मुलगा झाला. मात्र आठ महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ वर्षभरापूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनाली तणावात होती. त्यापाठोपाठ दुसरी मुलगी झाली. मात्र पहिला मुलगा आणि वडिलांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून तिने बाळाला फेकल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

Web Title: 39-day-old infant killed by mother; Thrown from the 14th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.