हाती उरले 39 दिवस! यंदा कुठे होणार विक्रम; गेल्या वेळी सांगलीकरांचा होता रेकाॅर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:38 AM2024-04-12T06:38:05+5:302024-04-12T06:38:43+5:30
गेल्या वेळी राज्यात सांगलीकरांनी केला होता रेकाॅर्ड, तर कल्याणमध्ये झाले होते सर्वांत कमी मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मुंबईमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाला सुमारे ४० दिवस उरले आहेत. मात्र, अद्याप अनेक जागांसाठी उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर महायुती आणि महाविकास आघाडीला घाई करावी लागेल. कारण मुंबईतील मतदारसंघांमध्ये २०१९च्या निवडणुकीत कमी मतदान झाले होते.
जास्त मतदान असलेले मतदारसंघ
मतदारसंघ पक्ष विजय मतदार लाख टक्केवारी
सांगली भाजप संजयकाका पाटील १४.२ ८४
बीड भाजप प्रीतम मुंडे १६.२ ८३.६
गडचिरोली-चिमूर भाजप अशोक नेते १५.२ ७६.७
हातकणंगले शिवसेना धैर्यशील माने १६.९ ७४.२
कोल्हापूर शिवसेना संजय मंडलिक १८.१ ७४.२
नंदुरबार भाजप डॉ. हिना गावित १७.९ ७२.२
भंडारा-गोंदिया भाजप सुनील मेंढे १७.६ ७१.५
पालघर शिवसेना राजेंद्र गावित १७.३ ७१.३
हिंगोली शिवसेना हेमंत पाटील १६.६ ७०
नांदेड भाजप प्रतापराव चिखलीकर १६.३ ६९.५
कमी मतदान असलेले मतदारसंघ
कल्याण शिवसेना डॉ. श्रीकांत शिंदे १८.६ ४८.५
उत्तर पश्चिम शिवसेना गजानन कीर्तिकर १९.१ ५०.३
पुणे भाजप गिरीश बापट १९.९ ५२.४
दक्षिण मुंबई शिवसेना अरविंद सावंत १५.४ ५३.१
ठाणे शिवसेना राजन विचारे २१.८ ५४.७
उत्तर-मध्य मुंबई भाजप पुनम महाजन १६.१ ५६.७
बुलढाणा शिवसेना जाधव गणपतराव १९.८ ५७
भिवंडी भाजप कपिल पाटील १७.९ ५७.२
नागपूर भाजप नितीन गडकरी २०.६ ५७.८
दक्षिण-मध्य मुंबई शिवसेना राहुल शेवाळे १३.९ ५८.४