तीन परदेशी तरुणांकडून ३९ कोटीेंचे कोकेन जप्त; अंबोली पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 02:18 AM2019-02-11T02:18:02+5:302019-02-11T02:18:15+5:30
उच्चभ्रू व महाविद्यालयीन तरुण- तरुणींना अंमली पदार्थ विकणाऱ्या एका टोळीचा छडा लावून अंबोली पोलिसांनी तब्बल ६.४९ किलो कोकेन रविवारी जप्त केले.
मुंबई : उच्चभ्रू व महाविद्यालयीन तरुण- तरुणींना अंमली पदार्थ विकणाऱ्या एका टोळीचा छडा लावून अंबोली पोलिसांनी तब्बल ६.४९ किलो कोकेन रविवारी जप्त केले. आंतरराष्टÑीय बाजार पेठेत या अंमली पदार्थाची किंंमत ३ ८ कोटी ९५ लाख ९७ ,६०० रुपये आहे. राज्यातली नव्या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
याप्रकरणी निरस अझुबिक ओखोवा (३५), सायमन अगोबता (३२) व मायकेल संदे होप (२९) यांना अटक करण्यात आली आहे. निरस व सायमन हा नायझेरियन तर मायकेल हा ब्राझिलचा आहे. त्यांनी घरात खिडक्यांना लावणाºया कापडी पडद्यात धातूच्या रिंगामध्ये हे कोकेन लपवून ठेवले होते, असे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले
अंधेरीतील मोर्या लॅन्डमार्क दोन या परिसरात घरातील दरवाजे, खिडक्यांना बसविण्यात येणाºया कापडी पडदे विक्रीच्या निमित्ताने आंतरराष्टÑीय टोळीतील काहीजण अंमली पदार्थ घेऊ न येणार असल्याची माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दया नायक यांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी सहकाºयासमवेत सापळा लावला होता. तेव्हा संशयास्पदरित्या फिरत असलेल्या तिघांना ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यांच्याजवळ प्लॅस्टिकच्या पिशवामध्ये कोकेन मिळून आले. कापडी पडद्याचा धातूच्या रिंगा व किनारीसाठी वापरल्या जाणाºया रिबीनच्या खाली पिशवीमध्ये ही पावडर लपविण्यात आली होती. त्यानंतर ते रहात असलेल्या ठिकाणी छापा टाकून तपासणी केली असता तेथेही पडद्याचे अनेक गठ्ठे आढळले. याठिकाणी एकूण सहा किलो ४९ ग्रॅम कोकेन पावडर होती. शहर व उपनगरातील विविध भागातील ‘पेज थ्री’ पार्ट्या व महाविद्यालयीन युवकांना हे अंमली पदार्थ पुरविण्यात येत होते, असे अप्पर आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. पकडलेल्या तिघांपैकी निरस अझुबिक याच्यावर ‘एनडीपीएस’अतर्गंत कारवाई करण्यात आली असून दोन महिन्यांपूर्वी तो भायखळा कारागृहातून सुटला आहे. त्याच्याकडे ८० हजार रुपयांची बेल पावती मिळाली आहे. या आंतरराष्टÑीय टोळीतील अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.