Join us  

‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 7:51 AM

या जमिनी ३० वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता

मुंबई : एसटी महामंडळाच्या मुंबईसह ३९ ठिकाणच्या जमिनी ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर ६० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. या जमिनी ३० वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता; पण त्याला विकासकांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता.

आता ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर खासगी विकासकांना या जमिनी देऊन त्यावर एसटी महामंडळाची अत्याधुनिक बसस्थानके, डेपो आणि व्यावसायिक संकुलांची उभारणी केली जाणार आहे.  एसटी महामंडळाच्या या भूखंडावर उपलब्ध होणारे चटई क्षेत्र (महामंडळाच्या बांधकामासाठीचे ०.५ वगळता) व्यापारी तत्त्वावर वापरण्याची मुभा देण्यात येईल. बीओटीच्या निविदा महामंडळाच्या स्तरावरच अंतिम करण्यात येतील.

३९ जागा कोणत्या? 

मुंबई सेंट्रल, कुर्ला, विद्याविहार, वाडा (ठाणे) तसेच कणकवली, लोणावळा, ताराबाई पार्क-कोल्हापूर, पन्हाळा, अकलूज, माळशिरस, नातेपुते, सोलापूर-पुणे नाका, सांगली मध्यवर्ती बसस्थानक, आटपाडी, जळगाव, जळगाव शहर बसस्थानक, मुक्ताईनगर, स्वस्तिक चौक-अहमदनगर, तारकपूर-अहमदनगर, पाथर्डी, सुपा, पारनेर, छत्रपती संभाजीनगर, शहागंज, पैठण, शिवाजी चौक-लातूर, बीड, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, धाराशिव, उमरगा, मुरूम, कळंब, हदगाव, जिंतूर, रिसोड, वाशिम, चांदूर बाजार, पुसद आणि भंडारा. 

टॅग्स :महाराष्ट्रमहाराष्ट्र सरकार