मुंबईत गेल्या महिनाभरात ३९६ चोरीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:08 AM2020-12-02T04:08:45+5:302020-12-02T04:08:45+5:30
४४ हजार ४९८ गुन्ह्यांची नोंद : लाॅकडाऊन शिथिल हाेताच चाेरट्यांचे पुन:श्च हरिओम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या महिनाभरात ...
४४ हजार ४९८ गुन्ह्यांची नोंद : लाॅकडाऊन शिथिल हाेताच चाेरट्यांचे पुन:श्च हरिओम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या महिनाभरात ३९६ चोरीच्या, तर ३२२ वाहन चोरीच्या घटनांची नोंद पोलीस दफ्तरी झाली.
गेल्या १० महिन्यात मुंबईत एकूण ४४ हजार ४९८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ३५ हजार १४३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. लॉकडाऊनचे सुरुवातीच्या मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली हाेती. मात्र जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे स्वरूपात आले. तर ऑक्टोबरमध्ये याचे प्रमाण आणखी वाढले.
गेल्या महिन्यात हत्येच्या (१७), हत्येचा प्रयत्न (५५), जबरी चोरी (२), सोनसाखळी चोरी (८५), खंडणी(२१), घरफोडी (१६०), चोरी (३९६), वाहन चोरी (३२२) अशा प्रकारे गुन्ह्यांची नाेंद झाली.
* ४२ मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार
गेल्या महिनाभरात ४२ मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्या. यापैकी ३९ गुन्ह्यांची उकल करण्यात पाेलिसांना यश आले. तर ९५ मुलींच्या अपहरणाची नोंद झाली असून, त्यापैकी ६५ मुलींचा शोध घेण्यात आला. विनयभंग प्रकरणी २२९ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी १५८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
.................................