Join us

राज्यात ४ कोटी १ लाख लोकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याने पुन्हा एकदा लसीकरणात विक्रम रचला आहे. चार कोटी लोकांच्या लसीकरणाचा टप्पा मंगळवारी ओलांडण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याने पुन्हा एकदा लसीकरणात विक्रम रचला आहे. चार कोटी लोकांच्या लसीकरणाचा टप्पा मंगळवारी ओलांडण्यात आला. लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आतापर्यंत एकूण ४ कोटी १ लाख ८ हजार ५७४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात १ लाख ८९ हजार ७३३ जणांना लस देण्यात आली.

राज्यात १२ लाख ८४ हजार ६२९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ८ लाख ८७ हजार ५४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ लाख ११ हजार ६०६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १० लाख ६८ हजार ६११ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ९८ लाख ७९ हजार ६११ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ४ लाख २० हजार ९२४ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ७४ लाख ७६ हजार ४२१ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ६९ लाख ७९ हजार २२८ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.