अलिबाग : नावीन्यपूर्ण योजनेद्वारे जिल्हय़ातील विकासात्मक कामांसाठी विविध विभागांना निधी देण्यात आला असून त्याद्वारे जिल्हय़ात सर्वत्र विकासकामे मार्गी लागतील अशी माहिती पालकमंत्री सचिन अहिर यांनी मंगळवारी येथे दिली. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, रायगड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, अपर पोलीस अधीक्षक राजा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कुंडलिका, सावित्री, अंबा नदीकिनारी पूर पूर्वसूचना(अलार्म) यंत्रणा
नावीन्यपूर्ण योजनांसाठी 4.32 कोटी रु पयांचा नियतव्यय मंजूर असून 3.39 कोटीच्या या योजना आहेत. त्यातून जिल्हय़ात, श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीतील रोडलाईटसाठी एल.ई.डी. बसविणो, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लाईटिंग व साऊंडची व्यवस्था करणो, जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणो, व्हिडीयो कॉन्फरन्सिंग यंत्रणा अद्ययायवत करणो, रायगड किल्ल्याशेजारी शिवसृष्टी तयार करणो, सागरी किनारी आपत्ती व्यवस्थापन व जनजागृती अभियानासाठी अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन व उरण नगरपरिषद तसेच काही ग्रामपंचायतींना मदत, ग्रामीण सौर तंत्रज्ञ विकास कार्यक्र माअंतर्गत ग्रामीण युवक, युवतींना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यासाठी सहाय्य करणो, पदवी पूर्ण करणा:या विद्याथ्र्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणो, जिल्ह्यातील क्रीडा संकुलांसाठी क्रीडा साहित्य खरेदी करणो, कुंडलिका नदी, सावित्री नदी, अंबा नदी येथे पूर पूर्वसूचना(अलार्म) यंत्रणा बसविणो.त्याचप्रमाणो रायगडावर जाणा:या रस्त्यावर कमान बांधणो यांचा समावेश असल्याचे अहिर यांनी सांगितले.
विविध निधींचे प्रत्यक्ष वितरण व विकासकामे मार्गस्थ
जिल्हा वार्षिक योजनेसाठी 135 कोटींपैकी 78.7क् कोटी निधी प्राप्त झाला असून त्यापैकी 52.44 कोटी वितरीत झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली. डोंगरी विकास कार्यक्र म अंतर्गत 11.5क् कोटी निधी मंजुर असून 6.9क् कोटी निधी प्राप्त झाला तर 5.22 कोटी वितरीत करण्यात आला. आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्र मात 18 कोटी निधी मंजूर व प्राप्त असून त्यापैकी 4.83 कोटी निधी म्हणजे 26.85 टक्के निधी वितरीत झाला. खासदार स्थानिक विकास कार्यक्र मात 19 कोटी निधी मंजूर असून त्यापैकी 14 कोटी प्राप्त झाला तर 13.97 म्हणजे 99.79 टक्के निधी वितरीत करण्यात आला. याशिवाय अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत 19.क्6 कोटी निधी मंजूर असून त्यातील 4 कोटी प्राप्त तर 3.64 म्हणजे 91.13 टक्के निधी वितरीत झाला असल्याचे भांगे यांनी पुढे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
च्जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या विविध प्रस्तावात दोन मिनी ऑईल मिल, अपंगांना फळ झाडांची वाटप कार्यक्रम, होमिओपॅथी औषधांचा वापर करणो, जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत विविध सभेत चर्चिले जाणारे मुद्दे रेकॉर्डिंग करु न ठेवण्यासाठी 3 एल.सी.डी. रेकॉर्डिंग यंत्रणा च्जिल्हा पशुसंवर्धन रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना पशुपालकांना अनुदानावर एलईडी सौर कंदील, पोलीस अधीक्षक रायगड यांचेसाठी सौरऊर्जावर चालणारे पथ दिवे खरेदी करणो, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नगर परिषद महाड, रोहा, श्रीवर्धन, माणगांव, अलिबाग, पेण, खोपोली, खालापूर, रसायनी, कर्जत हद्दीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणो.