कारशेडच्या विरोधातील दाव्यावर चार काेटींचा खर्च; मुंबई मेट्रो रेलची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 11:23 AM2023-03-29T11:23:39+5:302023-03-29T11:24:32+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मागील ७ वर्षांची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : मेट्रो ३ च्या आरे कॉलनी येथील कारशेडविरोधात करण्यात आलेल्या दाव्यावर ३.८१ कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे देण्यात आली. यात सर्वाधिक रक्कम महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना देण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे मुंबई मेट्रो ३ च्या न्यायालयीन दाव्यावर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. गलगली यांना मागील ७ वर्षांची माहिती देण्यात आली आहे. ३० डिसेंबर २०१५ पासून ९ जानेवारी २०२३ यादरम्यान ७ वर्षांत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने एकूण ३ कोटी ८१ लाख ९२ हजार ६१३ रूपये न्यायालयीन दाव्यावर खर्च केले आहेत, अशी माहिती यावेळी संबंधित यंत्रणेकडून देण्यात आल्याचे गलगली यांनी सांगितले.
मेट्रो कारशेडअंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणात मेट्रो ३ तर्फे वकिलांना किती शुल्क प्रदान करण्यात आले, कोणावर किती खर्च ?
आशुतोष कुंभकोणी १.१३ कोटी
अस्पी चिनोय ८३.१९ लाख
किरण भागलिया ७७.३२ लाख
तुषार मेहता २६.४० लाख
मनिंदर सिंह २१.२२ लाख
रुक्मिणी बोबडे ७ लाख
चितळे अँड चितळे ६.९९ लाख
शार्दूल सिंह ५.८१ लाख
अतुल चितळे ३.३० लाख
एडजीडब्लू मत्तोस १.७७ लाख