मुंबई : मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावर ४ दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे प्रकल्पासंबंधित बेलापूर यार्ड रिमॉडलिंगचे काम करण्यात येणार आहे. सीवूड आणि बेलापूरदरम्यान सध्याचा रेल्वेमार्ग नवीन मार्गांना जोडण्यात येणार आहे. या कामात एकूण ६ ठिकाणी रूळ तोडून जोडण्याचे काम होणार आहे. यात एकू ण ३ ठिकाणी रूळ जोडणीचे काम, क्रॉसिंगचे काम आणि एका बोगद्यातून दुसºया बोगद्यात रेल्वे रूळ स्थलांतरित करण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी ५०० कर्मचाºयांचा फौजफाटा मध्य रेल्वे प्रशासनाने सज्ज केला आहे. ब्लॉकच्या शेवटच्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेला जादा बस सोडण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.२२-२३ डिसेंबर-वेळ : गुरुवार-शुक्रवार रात्री २ ते शनिवार-रविवार रात्री २ वाजेपर्यंत (४८ तासांचा ब्लॉक)स्थळ : बेलापूर फलाट क्रमांक २- गर्दीचा काळ नसताना बेलापूरहून सुरू होणाºया आणि संपणाºया ६५पैकी ३१ फेºया रद्द. १८ फेºया पनवेलपर्यंत चालविण्यात येतील. नेरूळ येथे ४, वाशी येथे १० आणि मानखुर्द येथे २ फेºया थांबविण्यात येतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी ट्रान्सहार्बर या वेळापत्रकानुसार धावणार आहेत.२४-२५ डिसेंबर-शनिवार-रविवार रात्री २ वाजेपासून ते रविवार-सोमवार रात्री २ वाजेपर्यंत (२४ तासांचा ब्लॉक)स्थळ : बेलापूर फलाट क्रमांक २२५ डिसेंबर-वेळ : रविवार-सोमवार पहाटे २ पासून सोमवार दुपार ३ पर्यंत १३ तासस्थळ : नेरूळ ते पनवेलदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गादरम्यान ब्लॉकएकूण फे-या : ४८२,रद्द केलेल्या फे-या : १६४ट्रान्सहार्बरवरील एकूण सेवा : २३०रद्द केलेल्या फे-या : ४०नेरूळ-पनवेलदरम्यान ब्लॉक काळात ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द
हार्बरवर ४ दिवसांचा ब्लॉक, बेलापूर-उरण टप्प्याचे काम; पालिकेला जादा बस सोडण्याची विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 4:10 AM