४ घरफोड्या, ३.५0 लाखांचा ऐवज लंपास

By admin | Published: March 11, 2017 01:05 AM2017-03-11T01:05:11+5:302017-03-11T01:05:11+5:30

ठाणे शहरात घरफोडीच्या चार घटना घडल्या असून, त्यापैकी ३ घटना नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत. एका घरफोडीमध्ये चोरांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज

4 house burglary, Rs 3.50 lakh lump | ४ घरफोड्या, ३.५0 लाखांचा ऐवज लंपास

४ घरफोड्या, ३.५0 लाखांचा ऐवज लंपास

Next

ठाणे : ठाणे शहरात घरफोडीच्या चार घटना घडल्या असून, त्यापैकी ३ घटना नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत. एका घरफोडीमध्ये चोरांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास करून, कुटुंबीयांना घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
खोपट परिसरातील सिद्धेश्वर तलावाजवळ राहणारे हरिश्चंद्र पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरांनी बुधवारी पहाटे ३.३0 वाजताच्या सुमारास २.२८ लाखांचे दागिने आणि ३३ हजार ५00 रुपये रोख असा एकूण २ लाख ६१ हजार ५४0 रुपयांचा ऐवज लंपास केला. या वेळी पाटील कुटुंबीय घरात झोपलेले होते. चोरांनी बाहेर पडताना दरवाजा बाहेरून बंद करून पाटील कुटुंबीयांना घरात कोंडले. त्यानंतर जवळच्याच एका घराकडे चोरांनी मोर्चा वळवला, परंतु घरातील कुटुंबीयांना जाग आल्याने त्यांचा प्रयत्न फसला. या कुटुंबीयांनी रस्त्यावर येऊन चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, पाटील कुटुंबीयांची आरडाओरड त्यांना ऐकू आली. त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर पाटील कुटुंबीयांची सुटका झाली. नौपाडा पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
चरई परिसरातील एका दुकानात बुधवारी रात्री ४२ हजार ४२0 रुपयांची चोरी झाली. चोरांनी दुकानाचे शटर उचकटून रोकड साफ केली. प्रसाद भोईटे यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. घरफोडीची तिसरी घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरात गुरुवारी सकाळी घडली. या भागातील पत्रकार नीलेश भुवड यांच्या घरातून चोराने ११ हजार रुपयांचे मोबाइल फोन लंपास केले. (प्रतिनिधी)

दोन युवतींनी केली दिवसा घरफोडी
मखमली तलावाजवळील एका सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी १६ आणि १८ वर्षे वयोगटातील दोन तरुणींनी ४४ हजार ५00 रुपयांची घरफोडी केली. राजेशकुमार जयस्वाल यांचे कुटुंब बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरात झोपलेले असताना या मुलींनी तारेच्या साहाय्याने दरवाजा उघडला. दोन मोबाइल फोन आणि २0 हजार रुपये रोख असा ४४ हजार ५00 रुपयांचा ऐवज या मुलींनी लंपास केला. जयस्वाल यांनी सोसायटीतील सीसी कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता मुलींचा गुन्ह्यातील सहभाग उघडकीस आला. नौपाडा पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Web Title: 4 house burglary, Rs 3.50 lakh lump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.