Join us

गोवंडीमध्ये एक मजली बांधकाम कोसळून ४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:06 AM

मुंबई : गोवंडीतल्या शिवाजीनगर येथील तळमजला अधिक एक मजली बांधकाम कोसळले. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू, ...

मुंबई : गोवंडीतल्या शिवाजीनगर येथील तळमजला अधिक एक मजली बांधकाम कोसळले. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू, तर सातजण जखमी झाले.

नेहा परवेझ शेख (वय ३५), मोकार झुबीर शेख (८०), शमशाद शेख (४५) आणि फरिन शेख (२२) अशी मृतांची नावे आहेत, तर परवेझ शेख, अमिनबा शेख, अमोल धडेयी, समोल सिंग, फैजल कुरेशी, नम्रा कुरेशी, शाहीन कुरेशी हे जखमी आहेत. घाटकोपर येथील राजावडी रुग्णालयात चारश तर सायन रुग्णालयात तीन जखमींवर उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सात फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन, १०८ क्रमाकांच्या तीन रुग्णवाहिका, दोन जेसीबी, एक डंपरसह नऊ कामगार मदतकार्यासाठी पाठवण्यात आले होते. शक्य होईल तेवढ्या वेगाने कोसळलेल्या घराचे ढिगारे बाजूला सारत जखमींना राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल केले जात होते. पाऊस आणि दाटीवाटीच्या वस्तीत मदतकार्य करण्यास काही अडथळे येत असले तरी पहाटे सुरू झालेले मदतकार्य दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. स्थानिकांनी देखील प्रशासनाला मदतकार्यात सहकार्य केले.