मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२ टक्के असून, मृत्युदर १.५१ टक्के आहे. राज्यात सध्या ४ लाख ९४ हजार ३२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात शनिवारी ३४ हजार ८४८ रुग्ण आणि ९६० रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ५३ लाख ४४ हजार ६३ रुग्ण असून, मृतांचा एकूण आकडा ८० हजार ५१२ झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ८ लाख ३९ हजार ४०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३४ लाख ४७ हजार ६५३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २८ हजार ७२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ९६० मृत्यूंपैकी ३७१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १८८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४०१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ९६० मृत्यूंमध्ये मुंबई ६२, ठाणे १९, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा १०, कल्याण डोंबिवली मनपा ४२, भिवंडी निजामपूर मनपा ४, पालघर १७, वसई विरार मनपा १४, रायगड ११, पनवेल मनपा ७, नाशिक १६, नाशिक मनपा १२, मालेगाव मनपा २, अहमदनगर २९, अहमदनगर मनपा ४, जळगाव २४, जळगाव मनपा ८, नंदूरबार ६, पुणे २०, पुणे मनपा ३१, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ७७, सोलापूर मनपा १४, सातारा ११, कोल्हापूर ६, कोल्हापूर मनपा १, सांगली ७, सांगली मिरज कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग २१, रत्नागिरी २८, औऱंगाबाद २१, औरंगाबाद मनपा ७, जालना १३, हिंगोली १९, परभणी ४, परभणी मनपा ३, लातूर २६, लातूर मनपा ५, उस्मानाबाद ५, बीड ३५, नांदेड ३२, नांदेड मनपा १०, अकोला ५, अकोला मनपा ६, अमरावती १९, अमरावती मनपा ४, यवतमाळ ७, वाशिम ५, नागपूर ४८, नागपूर मनपा ९६, वर्धा ६, भंडारा १९, गोंदिया ८, चंद्रपूर ४६, चंद्रपूर मनपा ५ आदी रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय सक्रिय रुग्णांची आकडेवारी
जिल्हारुग्णसंख्या
पुणे ९३२४५
नागपूर ३६५६०
मुंबई ३४०८३
ठाणे २९६५४
नाशिक २०२१८