‘एमएमआर’मध्ये उपलब्ध अकरावीच्या चार लाख जागा, यंदा २५ हजार जागांची भर, महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 06:22 AM2024-06-07T06:22:52+5:302024-06-07T07:03:28+5:30
एमएमआरमधील ज्युनिअर कॉलेजांची संख्या यंदा १,०१७ वरून १,०४५ झाली आहे. त्यामुळे जागांमध्येही वाढ झाली आहे.
मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या एमएमआर क्षेत्रातील अकरावीच्या जागांमध्ये सुमारे २५ हजारांची भर पडली आहे. यंदा या वर्गाच्या प्रवेशासाठी ३,९९,२३५ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी ३ लाख ७५ हजार जागा या क्षेत्रात उपलब्ध होत्या.
एमएमआरमधील ज्युनिअर कॉलेजांची संख्या यंदा १,०१७ वरून १,०४५ झाली आहे. त्यामुळे जागांमध्येही वाढ झाली आहे.
सध्या अकरावीसाठी ‘प्रेफरन्स’ भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती १६ जूनपर्यंत चालणार आहे. २६ जूनला ‘प्रेफरन्स’नुसार जागा वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी गेल्यावर्षीचे ‘कटऑफ’ वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया जुलैपर्यंत संपविण्याचा विचार आहे.
एमएमआरमध्ये उपलब्ध असलेल्या सुमारे चार लाख जागांपैकी १,५१,७३५ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन अशा विविध कोट्यातील आहेत. या कोट्यातील जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेसोबत सुरू राहील.
कॅपसाठी उपलब्ध असलेल्या शाखानिहाय जागा
आर्टस् ३४,६८९
कॉमर्स १,२५,९२१
सायन्स ८३,६०८
एचएसव्हीसी ३,२८२
ठाणे जिल्ह्यातील जागा
एकूण जागा १,४०,९१०
आर्टस् २१,४२०
कॉमर्स ६६,९८०
सायन्स ५१,५८०
एचएसव्हीसी ९३०
एकूण शाखानिहाय जागा
आर्टस् ५२,३१०
कॉमर्स २,०८,५२०
सायन्स १,३३,४४०
एचएसव्हीसी ४,९६५
कोटानिहाय जागा
इनहाऊस कोटा २६,२१३
अल्पसंख्याक १,००,९५५
व्यवस्थापन १८,५६७