Join us  

‘एमएमआर’मध्ये उपलब्ध अकरावीच्या चार लाख जागा, यंदा २५ हजार जागांची भर, महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 6:22 AM

एमएमआरमधील ज्युनिअर कॉलेजांची संख्या यंदा १,०१७ वरून १,०४५ झाली आहे. त्यामुळे जागांमध्येही वाढ झाली आहे.

मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या एमएमआर क्षेत्रातील अकरावीच्या जागांमध्ये सुमारे २५ हजारांची भर पडली आहे. यंदा या वर्गाच्या प्रवेशासाठी ३,९९,२३५ जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी ३ लाख ७५ हजार जागा या क्षेत्रात उपलब्ध होत्या.एमएमआरमधील ज्युनिअर कॉलेजांची संख्या यंदा १,०१७ वरून १,०४५ झाली आहे. त्यामुळे जागांमध्येही वाढ झाली आहे.

सध्या अकरावीसाठी ‘प्रेफरन्स’ भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती १६ जूनपर्यंत चालणार आहे. २६ जूनला ‘प्रेफरन्स’नुसार जागा वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी गेल्यावर्षीचे ‘कटऑफ’ वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अकरावी प्रवेशाची प्रक्रिया जुलैपर्यंत संपविण्याचा विचार आहे.

 एमएमआरमध्ये उपलब्ध असलेल्या सुमारे चार लाख जागांपैकी १,५१,७३५ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन अशा विविध कोट्यातील आहेत. या कोट्यातील जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेसोबत सुरू राहील.

कॅपसाठी उपलब्ध असलेल्या शाखानिहाय जागाआर्टस्     ३४,६८९कॉमर्स    १,२५,९२१सायन्स     ८३,६०८एचएसव्हीसी     ३,२८२ठाणे जिल्ह्यातील जागाएकूण जागा     १,४०,९१०आर्टस्    २१,४२०कॉमर्स     ६६,९८०सायन्स     ५१,५८०एचएसव्हीसी     ९३०

एकूण शाखानिहाय जागाआर्टस्     ५२,३१०कॉमर्स    २,०८,५२०सायन्स     १,३३,४४०एचएसव्हीसी     ४,९६५कोटानिहाय जागाइनहाऊस कोटा     २६,२१३अल्पसंख्याक     १,००,९५५व्यवस्थापन    १८,५६७

टॅग्स :महाविद्यालयशिक्षण