Join us

दिव्यात दुधाच्या लीटरमागे 4 रुपये जास्त!

By admin | Published: July 30, 2014 12:36 AM

छापील किमतीपेक्षा तब्बल 4 रुपये जास्त लीटरमागे आकारले जात असल्याने तीन लाख दिवेकर हैराण झाले आहेत.

अनिकेत घमंडी  - ठाणो
छापील किमतीपेक्षा तब्बल 4 रुपये जास्त लीटरमागे आकारले जात असल्याने तीन लाख दिवेकर हैराण झाले आहेत. या ठिकाणी सुमारे 50 हजार लीटर दूध प्रतिदिन वितरीत होते. मात्र, या अतिरिक्त आकारणीतून दिवसाला सुमारे 2 लाख रुपयांची मनमानी उलाढाल सर्वसामान्यांच्या माथी मारली जात असल्याचे वास्तव अॅड. आदेश भगत यांनी उघडकीस आणली आहे. प्रतिष्ठित कंपन्यांचा यामध्ये सहभाग नसला तरीही या ठिकाणचे डिस्ट्रीब्युटर आणि संबंधित व्यापारी ही जाचक लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
भगत यांच्या माहितीनुसार ठाणो महापालिकेच्या हद्दीत येणा:या दिवा येथे आजमितीस तीन लाखांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे दिवसाला सुमारे 5क् ते 75 हजार लीटर दूध वितरीत केले जाते. त्यासाठी गोकूळ-महानंदा-अमुल या दुधासाठी लीटरमागे छापील किंमत (एमआरपी) आकारण्यात यावी, असे नियंत्रक वैधमापन कार्यालयाचे संकेत असतानाच त्या व्यतिरिक्तही 4 रुपये जास्तीचे आकारण्यात येत असल्याचे ते म्हणाले. अनेकांच्या घरी दिवसाला 5 लीटर गोकूळ दूध आणण्यात येते. त्यामुळे त्यांनाही रोज 2क् रुपये जास्तीचे द्यावे लागत असल्याने मनमानी कारभाराची बाब उघडकीस आल्याचे ते म्हणाले.  केवळ गोकूळच नव्हे तर अमुल आणि महानंदा, श्रीकृष्णा या दुधाच्या बाबतीतही हेच होत असल्याने नागरिक पर्याय नसल्याने तोंड दाबून बुककयांचा मार सहन करत आहेत.
यासंदर्भात अॅड. भगत यांनी सोमवारीच सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र- ठाणो यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. त्या ठिकाणी मुख्य निरीक्षक ए.एस. महानवार या अधिका:याशी तक्रारीबाबत चर्चा करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही जास्तीची रक्कम संबंधित डिस्ट्रीब्युटर आणि व्यापारी यांच्यामुळे होत असल्याच्या असंख्य तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यानुसार, संबंधितांवर कारवाई करून दंडही आकारण्यात आला आहे. तरीही, हे प्रकार थांबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या तक्रारीची योग्य ती दखल घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
 
च्यासंदर्भात भगत यांनी दिव्यातील काही व्यापा:यांशी चर्चा केली. त्या माहितीनुसार लीटरमागे 1 रुपया डिस्ट्रीब्युटर घेतो, त्यामुळे त्यानंतर दूधविक्री करताना कुलिंगसह अन्य काळजी घ्यावी लागते. त्यामुळे लीटरमागे 3-4 रुपये जास्तीचे आकारले जात असल्याचे उघडकीस आले.
 
च्ठाणो महापालिकेच्या हद्दीत येणा:या दिवा येथे आजमितीस तीन लाखांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे दिवसाला सुमारे 5क् ते 75 हजार लीटर दूध वितरीत केले जाते. यासाठी 4 रुपये जास्तीचे आकारण्यात येत आहेत.
 
डोंबिवलीमुंब्रादिवा
गोकूळ5क्5क्54
महानंद383842
अमुल383842