मुंबईतील ४ एसटी आगार बंद, १४४ फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 05:20 AM2018-07-26T05:20:19+5:302018-07-26T05:20:58+5:30
मुंबईतील पाचपैकी चार आगार बुधवारी पूर्णत: बंद करण्यात आले होते
मुंबई : मुंबईतील पाचपैकी चार आगार बुधवारी पूर्णत: बंद करण्यात आले. यात मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरूनगर आणि पनवेल आगाराचा समावेश आहे, तर उरण एसटी आगार अंशत: सुरू होते. मुंबई प्रदेशातील एसटीचे मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल आगारातील एसटी फेºया सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होत्या. यानंतर, पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार एसटी फेºया बंद करण्यात आल्या.
आगारात एसटी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मुंबई सेंट्रल आगारातून रत्नागिरीत जाणाºया मुकद्दर आंबेडकर या प्रवाशाने सांगितले की, बुधवारी दुपारी १२ वाजता रत्नागिरीला जाण्यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचलो. मात्र तेथे एसटी उपलब्ध नव्हती.
सुरुवातीला नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले की, तासाभरात एसटी सुरू होईल. मात्र त्यानंतर, नियंत्रण कक्षातून कोणतीच माहिती देण्यात आली नाही. शिवाय मुंबई सेंट्रल बस स्थानकामध्ये वाहतूक बंद असल्याची कोणतीही उद्घोषणा सुरू नव्हती.
दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत कोणतीही एसटी उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘बंद’ काळात नियोजित ४१६ एसटी फेºयांपैकी २७२ फेºया पार पडल्या असून, १४४ फेºया रद्द करण्यात आल्या.