मुंबईत ४ हजार ७०६ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:08 AM2021-09-23T04:08:17+5:302021-09-23T04:08:17+5:30

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नोंदीनुसार बुधवारी कोरोनाचे ४८८ नवीन रुग्ण आढळले, तर दिवसभरात ३५९ रुग्ण बरे झाले. मृत रुग्णांची ...

4 thousand 706 active patients in Mumbai | मुंबईत ४ हजार ७०६ सक्रिय रुग्ण

मुंबईत ४ हजार ७०६ सक्रिय रुग्ण

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नोंदीनुसार बुधवारी कोरोनाचे ४८८ नवीन रुग्ण आढळले, तर दिवसभरात ३५९ रुग्ण बरे झाले. मृत रुग्णांची संख्या चार असून, दिवसातील चाचण्यांची संख्या ४० हजार ४८४ नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार १८७ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

१५ ते २१ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के होता. सध्या शहर उपनगरांत ४ हजार ७०६ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील कोविड रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ३९ हजार ३६४ आहे, मृतांची संख्या १६ हजार ६३ आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख १६ हजार ११६ आहे. आतापर्यंत १ कोटी ५९ हजार २५४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांत मुंबई पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २ हजार २६४ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. मुंबईत चाळ व झोपडपट्टींच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही, तर सक्रिय सीलबंद इमारतींच्या संख्या ४६ आहे.

Web Title: 4 thousand 706 active patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.