मुंबईत ४ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:34+5:302021-09-24T04:07:34+5:30

मुंबई : मुंबईत गुरुवारी ४९७ रुग्णांची नोंद झाली असून पाच मृत्यूची नोंद झाली आहे. ३९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ...

4 thousand 801 patients under treatment in Mumbai | मुंबईत ४ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन

मुंबईत ४ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन

Next

मुंबई : मुंबईत गुरुवारी ४९७ रुग्णांची नोंद झाली असून पाच मृत्यूची नोंद झाली आहे. ३९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ३९ हजार ७६१ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या १६ हजार ६८ वर पोहोचली आहे. सध्या ४ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याची संख्या ७ लाख १६ हजार ५११ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. मुंबईत १६ ते २२ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के असल्याची नोंद आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार २७३ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. ५१ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ४१ हजार ७३ तर आतापर्यंत एकूण १ कोटी १ लाख ३२७ चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

३७५ गंभीर रुग्ण

शहर उपनगरातील सक्रिय रुग्णांपैकी ३७५ रुग्णांची प्रकृती पालिकेच्या डॅशबोर्डवर नमूद आहे. तर २ हजार २४ रुग्ण लक्षणविरहित आहेत, २ हजार ३०७ रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे आहेत.

Web Title: 4 thousand 801 patients under treatment in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.