Join us

मुंबईत ४ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

मुंबई - मुंबईत शनिवारी ४५४ रुग्णांची नोंद झाली असून, पाच मृत्यूची नोंद झाली आहे. ५८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ...

मुंबई - मुंबईत शनिवारी ४५४ रुग्णांची नोंद झाली असून, पाच मृत्यूची नोंद झाली आहे. ५८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४० हजार ७६१ झाली आहे. मृतांचा आकडा १६ हजार ७९ वर पोहोचला आहे. सध्या ४ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शहर उपनगरात रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख १७ हजार ५२१ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. १८ ते २४ सप्टेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.०६ % टक्के असल्याची नोंद आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार १९५ दिवसांवर येऊन ठेपला आहे.

मुंबई चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एक प्रतिबंधित क्षेत्र आहे. ५३ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ४० हजार ९११, तर आतापर्यंत एकूण १ कोटी १ लाख ७७ हजार ७७४ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.