कोकण मंडळाच्या लॉटरीत ४ हजार घरे
By admin | Published: December 11, 2015 01:51 AM2015-12-11T01:51:33+5:302015-12-11T01:51:33+5:30
जानेवारी महिन्यात कोकण मंडळाची जाहिरात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. त्यानुसार, कोकण मंडळाचे अधिकाऱ्यांनी लॉटरीची तयारी सुरू केली आहे.
मुंबई : जानेवारी महिन्यात कोकण मंडळाची जाहिरात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. त्यानुसार, कोकण मंडळाचे अधिकाऱ्यांनी लॉटरीची तयारी सुरू केली आहे. या लॉटरीमध्ये मीरा रोड, ठाणे आणि विरार बोळींज येथील ४ हजार घरांचा समावेश आहे. या घरांची लॉटरी जानेवारी माहिन्यात काढण्याची तयारी सुरू असल्याचे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले.
कोकण मंडळाच्या विरार बोळींज येथील गृहप्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे या घरांची लॉटरी जानेवारीमध्ये काढण्याच्या हालचाली म्हाडा अधिकाऱ्यांनी सुरूकेल्या आहेत. या लॉटरीमध्ये विरार बोळींज येथे सर्वाधिक म्हणजे सुमारे ३ हजार ५00 घरे उपलब्ध होणार असून, मीरा रोड येथील २८0 आणि ठाणे येथील काही घरांचा समावेश आहे.
घरांच्या किमती ठरविणे आणि लॉटरीची इतर कामे पूर्ण करण्याची कामे सुरू आहेत. घरांच्या किमतींना प्राधिकरणाने हिरवा कंदील दिल्यानंतर लॉटरीच्या कामाला
गती येणार आहे. त्यानुसार,
लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध
करून लॉटरी काढण्यात येईल,
असे म्हाडा अधिकाऱ्याने
सांगितले. (प्रतिनिधी)