मुंबई :
दावोस दौऱ्यावरूनच शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. चार दिवसांच्या दावोस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत आदित्य म्हणाले, चार दिवसांच्या दावोस दौऱ्यात दिवसाला साडेसात ते दहा कोटी खर्च झाला. चार दिवसांसाठी ४० कोटी खर्च केले. यामध्ये आणखी नवीन खर्च वाढू शकतो, या दौऱ्यात त्यांच्यासोबत अधिकृत कोण होते? मित्रपरिवार सोबत गेला होता का? हे सगळे समोर यायला हवे.
दावोसला जाताना मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. यावर दोन ते अडीच कोटी खर्च झाला असेल. तरीही एकनाथ शिंदे उशिरा पोहोचले. यामुळे उद्घाटन सायंकाळी झाले व अनेक बैठका रद्द झाल्या, असा दावाही ठाकरेंनी केला.