मुंबई : कोरोनामुळे बुधवारी मुंबईत तब्बल ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी १७ मृत्यू हे ४ ते १० मे दरम्यानचे आहेत. २२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील २४ रुग्ण पुरुष आणि १६ रुधारावीमध्ये कोरोनाची ६६ नवी प्रकरणे आढळून आली. येथील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार २८ एवढा झाला आहे. दादरमध्ये ८ नवी प्रकरणे आढळून आली. २१ कोरोनाबाधितांना सोडण्यात आले आहे. ग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३ जणांचे वय ४० वर्षाखाली होते. २० जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित १७ रुग्ण ते ४० ते ६० वर्षादरम्यानचे होते.एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३३ झाली आहे. माहीमध्ये १२ नवी प्रकरणे आढळून आली. ३१ कोरोनाबाधितांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५५ झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिका प्रशासन सातत्याने उपाययोजन करीत आहे.मुंबईतील ३५५ ज्येष्ठ नागरिक उपचारानंतर झाले कोरोनामुक्तमुंबई : कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे. मात्र, योग्य वेळी उपचार मिळाल्यास यापैकी काही ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून येत आहे. ६० वर्षांवरील ३५५ रुग्ण आतापर्यंत या आजारातून बरे झाले आहेत.बहुतांश ज्येष्ठांमध्ये रक्तदाब, मधुमेह, दम्याचा विकार, हृदयविकार असे गंभीर आजार दिसून येतात. यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असल्याने खबरदारी घेण्याची सूचना पालिका प्रशासन देत असते. योग्य खबरदारी आणि नियमित योग्य उपचार घेतल्यास वृद्ध रुग्णही कोरोनामुक्त होतो, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्येष्ठांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरोघरी जाऊन पालिकेने त्यांची तपासणी केली. तसेच ज्यांच्या शरीरात आॅक्सिजनचे प्रमाण कमी आहे त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत तब्बल ३५५ ज्येष्ठ नागरिक या आजारातून बरे झाले आहेत. तर रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या ६० वर्षांवरील अनेक नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या रुग्णांची पुन्हा चाचणी करून तो अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.४६ बालके झाली बरीकोरोना हे संकट असले तरी योग्य उपचारामुळे कोरोनामुक्त होणे शक्य आहे. मुंबईतील पाच वर्षांखालील ४६ बालके तसेच १२ वर्षांखालील १०३ मुले याच उपचारांमुळे कोरोनातून बरी झाली.
मुंबईत कोरोनामुळे आणखी ४० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 7:24 AM