ड्रग्ज तस्कराकडून ४० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:06 AM2021-05-09T04:06:22+5:302021-05-09T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वरळीतील दूध डेअरीजवळील कामगार वसाहतीजवळ एका ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी ४० किलो गांजा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळीतील दूध डेअरीजवळील कामगार वसाहतीजवळ एका ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी ४० किलो गांजा जप्त केला. अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान पथकाने शनिवारी केलेल्या या कारवाईत शिवकुमार शंकर बसय्या (वय ४०, रा. महात्मा फुलेनगर, डेअरीसमोर, वरळी) याला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत ८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
बसय्या हा आंतरराज्य टोळीतील सदस्य असून त्याच्या अन्य साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. एएनसीच्या आझाद मैदान पथकातील हवालदार नाईक यांना वरळीत येणाऱ्या एका तस्कराकडे मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक राजेंद्र दहिफळे, सहायक निरीक्षक सचिन कदम यांनी सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून त्याला कामगार वसाहतीजवळील फुटपाथवर ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत दोन पॉलिथीनच्या गोणीमध्ये ४० किलो गांजा सापडला. बसय्या हा अमली पदार्थांची खरेदी-विक्री करत होता. तो कर्नाटकातून गांजाची तस्करी करीत होता, त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
..............................