वरळी स्फोटातील जखमींवर उपचारास ४० मिनिटे विलंब, प्राथमिक चौकशीतून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:10 AM2021-12-30T06:10:11+5:302021-12-30T06:10:35+5:30

Mumbai : वरळी बीडीडी चाळीतील घरात ३० नोव्हेंबरला सिलिंडरचा स्फोट होऊन एका कुटुंबातील चारजण जखमी झाले होते. या चार जणांना त्या दिवशी सकाळी ६.११ वाजता नायर रुग्णालयातील अपघात कक्षात आणले होते.

40 minutes delay in treatment of Worli blast victims, preliminary inquiry reveals | वरळी स्फोटातील जखमींवर उपचारास ४० मिनिटे विलंब, प्राथमिक चौकशीतून उघड

वरळी स्फोटातील जखमींवर उपचारास ४० मिनिटे विलंब, प्राथमिक चौकशीतून उघड

Next

मुंबई : वरळी येथील सिलिंडर स्फोटात जखमी कुटुंबावर पालिकेच्या नायर रुग्णालयात उपचार करण्यास ४० मिनिटे विलंब केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. याबाबतचा प्राथमिक अहवाल बुधवारी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला. या प्रकरणात उपचारास विलंब करणाऱ्या डॉक्टरला बडतर्फ तर परिचारिकेला निलंबित करून खात्यांतर्गत चौकशीचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. 

वरळी बीडीडी चाळीतील घरात ३० नोव्हेंबरला सिलिंडरचा स्फोट होऊन एका कुटुंबातील चारजण जखमी झाले होते. या चार जणांना त्या दिवशी सकाळी ६.११ वाजता नायर रुग्णालयातील अपघात कक्षात आणले होते. मात्र, प्राथमिक उपचार तत्काळ सुरू करणे आवश्यक असताना ४० मिनिटांनी त्यांना उपचार देण्यात आले, असे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. पालिकेने या विभागातील सीसीटीव्ही फुटेज बघून हा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. 

या प्रकरणात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक झा यांनी बडतर्फ केले आहे. तर, परिचारिका प्रीती सुर्वे यांची विभागीय, त्रयस्थ समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे. राज्याच्या आरोग्य संचनालयाचे सह. संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्याचा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या समितीने १३ व १४ डिसेंबरला नायर रुग्णालय येथे आपली प्राथमिक चौकशीची सुनावणी पूर्ण केली आहे. 

असा आहे त्या दिवसाचा घटनाक्रम...
सकाळी ६.११ वा. -जखमींना अपघात विभागात आणले.
६.१२ - कर्तव्यावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला माहिती देण्यात आली.
६.१४- वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक झा रुग्णांना तपासण्यासाठी आले.  विद्या पुरी यांना तपासून त्यांची कागदपत्रे बनविण्यात आली.

६.१६ - आनंद पुरी यांना तपासून कागदपत्रे बनविण्याचे काम सुरू
६.१८ - बालकांना पेनकिलर औषध पाजण्याची सूचना डॉक्टरांनी परिचारिका आणि विद्यार्थी परिचारिकेला केली.
६.४२ - शल्यचिकीत्सा विभागातील दोन डॉक्टर येऊन त्यांनी तपासणी करून उपचार सुरू केले.

Web Title: 40 minutes delay in treatment of Worli blast victims, preliminary inquiry reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.