मुंबई : मुसळधार पावसाचा जोर तलाव क्षेत्रांमध्ये कायम असल्याने गेल्या २४ तासांमध्ये आणखी तब्बल ८३ हजार दशलक्ष लीटर्सने जलसाठा वाढला आहे़ त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये ५८ दिवसांचा जलसाठा वाढला आहे़गेल्या आठवड्यापासून मुंबईतच नव्हे तर तलाव क्षेत्रातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे़ त्यामुळे गेल्या वर्षभराचा बॅकलॉग पाऊस भरून काढत असल्याचे चित्र आहे़ गतवर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला तीन लाख दशलक्ष लीटर्स अतिरिक्त जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे़ वर्षभर मुंबईत सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा आवश्यक आहे़ मात्र गेल्या वर्षी जेमतेम नऊ ते दहा लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा जमा झाला होता़ त्यामुळे मुंबईत आॅगस्ट २०१५ पासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे़ ही कपात रद्द करण्याची मागणी राजकीय पक्षांकडून होऊ लागली आहे़ (प्रतिनिधी)जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलावकमाल किमान आजची आजचा स्थितीपाऊस (मि़मी़)मोडक सागर १६३़१५१४३़२६१५४़०१७७़४०तानसा१२८़६३११८़८७१२४़६२१०७़८०विहार८०़१२७३़९२७७़२११२़४०तुळशी१३९़१७१३१़०७१३८़८३२४़००अप्पर वैतरणा ६०३़५१५९५़४४५९७़६९९३भातसा१४२़०७१०४़९०१२४़२७१०२मध्य वैतरणा२८५़००२२०़००२६२़३०७३़२०एकूण २०१६ ५८६३४२ दशलक्ष लीटर२०१५ २९३७८६ दशलक्ष लीटरपाणीकपात मागे घेण्यासाठी शिवसेनेचा प्रशासनावर दबावपुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने करून दाखविल्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू आहे़ मात्र खड्ड्यात गेलेले रस्ते, रस्ते व नालेसफाईचा घोटाळा अशा सर्व नकारात्मक गोष्टींमुळे शिवसेनेच्या रिपोर्टकार्डवर लाल शेरेच जास्त लागलेले आहेत़ पाणीकपात हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी पाणीकपात रद्द करण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत़ त्यामुळे जलसाठ्यात आज चांगली वाढ दिसून येताच, येत्या स्थायी समितीच्या बैठकीत ही कपात मागे घेण्यासाठी प्रशासनावर शिवसेनेकडून दबाव टाकण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते़
तलावांमध्ये ४० टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2016 3:30 AM