म.रे.वर ‘चेहरे ओळखणारे’ ४00 सीसीटीव्ही

By admin | Published: January 28, 2016 03:24 AM2016-01-28T03:24:18+5:302016-01-28T03:24:18+5:30

दहशतवादी किंवा एखाद्या गुन्ह्यातील आरोपीचा चेहरा ओळखणारे नवीन सॉफ्टवेअर असलेले ४00 सीसीटीव्ही कॅमेरे स्थानकांवर बसविण्याची योजना मध्य रेल्वेकडून आखण्यात आली आहे

400 cctv 'identifying faces' at the center | म.रे.वर ‘चेहरे ओळखणारे’ ४00 सीसीटीव्ही

म.रे.वर ‘चेहरे ओळखणारे’ ४00 सीसीटीव्ही

Next

मुंबई : दहशतवादी किंवा एखाद्या गुन्ह्यातील आरोपीचा चेहरा ओळखणारे नवीन सॉफ्टवेअर असलेले ४00 सीसीटीव्ही कॅमेरे स्थानकांवर बसविण्याची योजना मध्य रेल्वेकडून आखण्यात आली आहे. नवीन सॉफ्टवेअर असलेले सीसीटीव्ही प्रथमच लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर सध्या १,८00 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. यातही रेल्वेच्या इंटीग्रेटेड सुरक्षा यंत्रणेमार्फत उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही काही महत्त्वाच्या स्थानकांवर मागील वर्षात बसविण्यात आले. यात सीएसटी स्थानकात ३00, दादर येथे ११९, कुर्ला येथे १0४, लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये १५३, ठाणे येथे ९६, पुणे येथे ४६ आणि मिरज येथे १५ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र या सीसीटीव्हींचा दर्जा जरी चांगला असला तरी चेहरा ओळखून त्याची माहिती तत्काळ रेल्वे पोलिसांना देणारी सीसीटीव्ही यंत्रणा सध्या तरी नाही. सीसीटीव्हींचा दर्जा हा चांगला असावा आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी गेली काही वर्षे तरी सातत्याने प्रवाशांकडून होत आहे. त्या मागणीनुसार इंटिग्रेटेड सुरक्षा यंत्रणेमार्फत सीसीटीव्ही बसविण्यात आले. परंतु आता त्याहीपेक्षा चेहरा ओळखणारे नवीन सॉफ्टवेअर असलेले आणखी ४00 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना मध्य रेल्वेकडून आखण्यात आली आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेन्द्र पाटील यांना विचारले असता, नवीन सॉफ्टवेअर असलेले सीसीटीव्ही बसविण्याची योेजना आहे. हे नवीन तंत्रज्ञान असून त्यामुळे रेल्वे पोलिसांना गुन्हेगाराला किंवा संशयितांना पकडण्यास मदत मिळेल.

अशी
असेल यंत्रणा
आरोपींचे रेखाचित्र किंवा फोटो हे नवीन सीसीटीव्ही सॉफ्टवेअर यंत्रणेत टाकले जातील. हे सीसीटीव्ही ज्या ठिकाणी बसविण्यात येतील, त्या परिसरात संशयित किंवा गुन्ह्यातील आरोपी आल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो कैद होईल. त्यानंतर याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळेल व संशयिताला किंवा आरोपीला पकडण्यास मदत मिळेल.

४00 सीसीटीव्हींची माहिती रेल्वेकडून आम्हाला प्राप्त झाल्यानंतर ते कोणत्या स्थानकांवर बसवावे याच्या सूचना आमच्याकडून केल्या जातील.
- सचिन भालोदे (मध्य रेल्वे-आरपीएफ-वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त)

Web Title: 400 cctv 'identifying faces' at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.