आश्रमशाळेतील ४०० विद्यार्थी अंधारात
By admin | Published: September 22, 2014 12:55 AM2014-09-22T00:55:09+5:302014-09-22T00:55:09+5:30
मात्र मुख्याध्यापकांच्या विनंतीवरून सार्वजनिक ट्रान्सफॉर्मरवरून वीज दिल्याने प्रकाश एकदम अंधूक असल्याने काही दिवसावरच आलेल्या सहामाही परीक्षेचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
विक्रमगड : तालुक्यातील साखरा येथील शासकीय आश्रमशाळेचे एप्रिल ते जुलै २०१४ महीन्याचे थकीत वीजबील २२ हजार असल्याने वीज वितरणने या आश्रम शाळेचा ट्रान्सफॉर्मरच आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस काढून नेल्याने आश्रमशाळेतील ४०० विद्यार्थी अंधारात होते. मात्र मुख्याध्यापकांच्या विनंतीवरून सार्वजनिक ट्रान्सफॉर्मरवरून वीज दिल्याने प्रकाश एकदम अंधूक असल्याने काही दिवसावरच आलेल्या सहामाही परीक्षेचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
शासकीय आश्रमशाळा साखरा येथील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी चांगला प्रकाश मिळावा यासाठी ए. आ. वी. प्रकल्प जव्हार यांनी पैसे भरून बसविलेला ट्रान्सफॉर्मर विक्रमगड वीज वितरण विभागाने एप्रिल ते जुलै २०१४ महिन्याचे वीजबिल २२ हजार रू. थकीत असल्याचे कारण पुढे करीत आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस (गणपती सुट्टीत) काढून नेला. याबाबत मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ट्रान्सफॉर्मरचे आॅइल बदलण्याकरीता काढला असल्याचे कोणालाही न पटणारे उत्तर देण्यात आले.
वीज नसल्याने आश्रमशाळेतील ४०० विद्यार्थी अंधारात होते मात्र मुख्याध्यापकांच्या विनंतीवरून सार्वजनिक ट्रान्सफॉर्मरवरून वीज देण्यात आली. मात्र संध्याकाळच्या वेळी वीज वापर जास्त असल्याने आश्रमशाळेत प्रकाश एकदम अंधूक असतो. या उजेडात काही दिवसावरच आलेल्या सहामाही परिक्षेचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याबाबत परिसरातील गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून जो वीज ग्राहक प्रामाणिकपणे वीज वापर करतो त्यांना अवास्तव बील देवून हैराण केल जात वर्षांनुवर्षे वीजेची चोरी करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. वीजेचे बिल भरण्याच जो कधी तरी चुकतो त्यांला त्रास दिला जातो. (वार्ताहर)