Join us  

वर्सोवा येथील शोभायात्रेत ४००० नागरिक सहभागी

By मनोहर कुंभेजकर | Published: May 01, 2023 5:05 PM

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शोभायात्रा व बाईक रॅली काढण्यात आली. महाराष्ट्राची परंपरा दर्शविणाऱ्या वेशभुषा धारकांना पारितोषिक देण्यात आले.

मुंबई-माॅडेल टाऊन रेसिडेन्टस वेल्फेअर असोसिएशन व स्वप्नाक्षय मित्र मंडळ,वर्सोवा मेट्रो स्टेशन जवळ, सातबंगला यांच्यातर्फे दर वर्षाप्रमाणे यावर्षीही दि, १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शोभायात्रा व बाईक रॅली काढण्यात आली. महाराष्ट्राची परंपरा दर्शविणाऱ्या वेशभुषा धारकांना पारितोषिक देण्यात आले. ५०० बाईक स्वार व ४००० नागरिक या शोभायात्रेत सहभागी  होते. सुरुवातीला मुंबई महानगर  पालिकेतील सफाई कामगार व वरिष्ठ नागरिकांना व गरजुना चादर वाटप  करण्यात आले.

या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या पारंपरिक व सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविणारे चित्र रथ ( छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वर देखावा, व दुसरा देखावा पारंपारिक ज्ञानेश्वर महाराज , दिंडी,भजन  आदिवासी नृत्य, महिला लेझीम, ५१ ढोल पथक ,दांडपट्टा, वारकरी भजन , दिंडी ,मंगळागौर आदी ठेवण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून आमदार-विभागप्रमुख अँड.अनिल परब व राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.त्यांच्या हस्ते अपंगाना सायकल ,महानगर पालिकेतील सफाई कामगार यांना चादर व महिलांना साडी वाटप करण्यात आलेअशी माहिती पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते  देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांनी दिली.

सदर शोभायात्रा सकाळी १०.०० वा.सुरू झाली . असून ति चाचा नेहरू उद्यान माॅडेल टाऊन जे.पी.रोड, चारबंगला, बाॅनबाॅन लेन ,महाराष्ट्र लेन ,सातबंगला ,वर्सोवा, ओल्ड फिशरिज रोड मार्गे  सातबंगला ते माॅडेल टाऊन येथे संपली.

कार्यक्रमाचे आयोजन  देवेंद्र (बाळा) आंबेरकर, राजेश ढेरे ,संजिव (बिल्लू) कल्ले, अशोक मोरे ,अनिल राऊत, प्रशांत काशिद, विकी गुप्ता,दिनेश गवलानी प्रकाश जोशी, अंकुश पाटील, कृष्णा निर्गुण यांनी केले.-------------------------------

टॅग्स :मुंबई