Join us

दिवसभरात ४०२ रुग्ण, तर १४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत दिवसभरात ४०२ रुग्ण आणि १४ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे, तर सध्या ६ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत दिवसभरात ४०२ रुग्ण आणि १४ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे, तर सध्या ६ हजार ३४९ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार ३४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. १२ ते १८ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात २३ हजार ४८१ चाचण्या करण्यात आल्या तर आतापर्यंत कोरोनाच्या एकूण ७७ लाख ८९ हजार ७३३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी ५७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आतापर्यंत ७ लाख ७ हजार १२९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

शहर उपनगरातील चाळ व झोपडपट्ट्यांच्या वस्तीत सहा सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६२ आहे. मागील चोवीस तासांत रुग्णांच्या सहवासातील १ हजार ५६० अतिजोखमीच्या सहवासीताचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे.