मुंबई विमानतळावर 41 विमानांची वाहतूक, 4224 प्रवाशांना लाभ, 3 विमाने रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 07:31 PM2020-05-26T19:31:43+5:302020-05-26T19:32:06+5:30
मुंबई विमानतळावरुन मंगळवारी 22 विमानांनी टेकऑफ केले, तर19 विमानांचे आगमन झाले. तीन विमानांची उड्डाणे रद्द झाली.
मुंबई : मुंबई विमानतळावरुन मंगळवारी 22 विमानांनी टेकऑफ केले, तर19 विमानांचे आगमन झाले. तीन विमानांची उड्डाणे रद्द झाली.
देशांतर्गत विमान प्रवास सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी 41 विमानांची वाहतूक झाली. या सेवेचा लाभ 4224 प्रवाशांनी घेतला. सहा विमानकंपन्याद्वारे ही वाहतूक करण्यात अाली. तेरा विविध सेक्टर मधून ही वाहतूक झाली. या सेवेचा लाभ एकूण 4224 प्रवाशांनी घेतला त्यामध्ये 3114 प्रवासी मुंबईतून बाहेरील शहरांत गेले तर 1110 प्रवासी मुंबईत आले. सर्वात जास्त प्रवासी मुंबई ते दिल्ली या मार्गावर प्रवास करणारे होते.
मुंबई विमानतळावरुन रांचीसाठी पहिल्या विमानाने सकाळी साडेसहा वाजता उड्डाण केले. तर सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी लखनऊ येथून आलेल्या पहिल्या विमानाचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर येण्यासाठी व विमानतळावरुन घरी जाण्यासाठी रिक्षा टँक्सी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्यावर विसंबून असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.