‘नवीन जेट्टींसाठी ४१५ कोटींचा निधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:18 AM2018-04-12T05:18:47+5:302018-04-12T05:18:47+5:30

केंद्र सरकारच्या नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून नवीन मच्छीमार जेट्टी बांधकामासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य सरकारही मच्छीमारांच्या कल्याणासाठी अनेक पायाभूत सोयी- सुविधा निर्माण करत आहे.

415 crores 'fund for new jetty' | ‘नवीन जेट्टींसाठी ४१५ कोटींचा निधी’

‘नवीन जेट्टींसाठी ४१५ कोटींचा निधी’

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून नवीन मच्छीमार जेट्टी बांधकामासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य सरकारही मच्छीमारांच्या कल्याणासाठी अनेक पायाभूत सोयी- सुविधा निर्माण करत आहे. कोळी समाजाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आधुनिक पद्धतीने मासेमारी करत स्वत:ची प्रगती साधावी, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी बुधवारी केले.
मच्छीमारनगर (कफ परेड) येथे नवीन अत्याधुनिक मच्छीमार नौकेचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त विनोद नाईक, क्वाड्रील हेवी इंजिनिअरींग प्रा. लि. चे संचालक कॅप्टन (निवृत्त) फिरोज दलाल, मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयेश भोईर आदी उपस्थित होते. यावेळी जानकर म्हणाले की, केंद्र सरकारने नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून नवीन जेट्टी बांधकामासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. नवीन आधुनिक जेट्टींच्या बांधकामामुळे मासे वाहतूक करणे सोपे जाणार आहे.
>मासेमारीला शेतीचा दर्जा देण्यासाठी कायदा
मासेमारी व्यवसायाला शेती व्यवसायाचा दर्जा देण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे. विकास करताना कोणत्याही कोळीवाड्याचे स्थलांतर होणार नाही, असे आश्वासन जानकर यांनी संबंधित शिष्टमंडळाला दिले.

Web Title: 415 crores 'fund for new jetty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.