मुंबई : राज्यात दिवसभरात ४,१७४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ६५ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात बुधवारी ४,१५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६३,०८,४९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के एवढे झाले आहे.
सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात ४७,८८० रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९७,८७२ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ३७ हजार ९६२ इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५३,३८,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३,०७,९१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ६५ मृत्युंमध्ये मुंबई ४, रायगड ११, पनवेल मनपा २, नाशिक ५, नाशिक मनपा २, अहमदनगर १२, पुणे १, पुणे मनपा २, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर १०, सातारा ६, कोल्हापूर ३, सिंधुदुर्ग१, रत्नागिरी १, परभणी १, लातूर १, उस्मानाबाद १, बीड १ इ. रुग्णांचा समावेश आहे.