देशभरात रेल्वे अपघातात गेल्या पाच वर्षांत ४१९ प्रवाशांचा मृत्यू; १ हजार २४ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:18 AM2019-02-04T07:18:11+5:302019-02-04T07:18:21+5:30
मेल, एक्स्प्रेसच्या टक्कर, गाड्या रुळांवरून खाली घसरणे अशा मोठ्या अपघातांत गेल्या पाच वर्षांत एकूण ४१९ प्रवाशांना प्राण गमवावा लागला; तर १ हजार २४ प्रवासी जखमी झाले.
मुंबई : मेल, एक्स्प्रेसच्या टक्कर, गाड्या रुळांवरून खाली घसरणे अशा मोठ्या अपघातांत गेल्या पाच वर्षांत एकूण ४१९ प्रवाशांना प्राण गमवावा लागला; तर १ हजार २४ प्रवासी जखमी झाले. या अपघातातरेल्वे प्रशासनाचे एकूण २८२ कोटी ७८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
रेल्वे बोर्डाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त कागदपत्रांनुसार, एप्रिल २०१३ पासून ते मार्च २०१८ पर्यंत एकूण ३५० मोठे रेल्वे अपघात झाले. गाड्यांची टक्कर, गाड्या घसरणे, रेल्वेत आगीच्या घटनांचा मोठ्या अपघातात समावेश आहे. या अपघातात एकूण ४१९ प्रवाशांचा मृत्यू झाला. यासह १ हजार २४ प्रवासी जखमी झाले. रेल्वे अपघातात गाड्या रुळावरून खाली उतरणे किंवा पलटण्याचे प्रमाण ९० टक्के असून या अपघातांची संख्या ३१३ आहे. तर गाड्यांची टक्कर होण्याचे प्रमाण ६ टक्के आणि आग लागण्याचे प्रमाण ४ टक्के आहे.
अमृतसर येथे आॅक्टोबर २०१८मध्ये दसºयादिवशी रावण दहनावेळी नागरिक रेल्वे रुळावर आले होते. तेव्हा मेल, एक्स्प्रेसच्या धडकेत ५९ नागरिकांना जीव गमवावा लागला.