राज्यातील 419 आयटीआय कॉलेजचा कायापालट होणार, 'टाटा'च मदतीला येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:16 PM2021-06-09T16:16:32+5:302021-06-09T16:25:52+5:30

टाटा टेक्नॉलॉजी व सहयोगी उद्योजक यांच्या सहकार्यातून राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करणे व सहा उच्च श्रेणी केंद्र आणि तीन कृषिविषयक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.

419 ITI colleges in the state will be transformed, only Tata will come to the rescue, sharad pawar tweeted | राज्यातील 419 आयटीआय कॉलेजचा कायापालट होणार, 'टाटा'च मदतीला येणार

राज्यातील 419 आयटीआय कॉलेजचा कायापालट होणार, 'टाटा'च मदतीला येणार

Next
ठळक मुद्देशरद पवार यांनी या बैठकीचा फोटो शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि मंत्री नवाब मलिक यांसह अनेक मान्यवर हजर असल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - राज्यातील औद्यगिक प्रशिक्षण संस्थांचा कायापालट करण्याचा मानस शासनाच्या विचाराधानी आहे. त्यासाठी, टाटा टेक्नॉलॉजीसह सहयोगी कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील एकूण 419 शासकीय आयटीआय प्रशिक्षण संस्थांमध्ये तीन कृषिविषयक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याबाबतचा प्रस्तावही विचाराधीन आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 

टाटा टेक्नॉलॉजी व सहयोगी उद्योजक यांच्या सहकार्यातून राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करणे व सहा उच्च श्रेणी केंद्र आणि तीन कृषिविषयक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. उपरोक्त संदर्भाधीन विषयाच्या अनुषंगाने राज्यात रोजगार वृद्धी व कुशल मनुष्यबळ विकसित करण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. 


शरद पवार यांनी या बैठकीचा फोटो शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि मंत्री नवाब मलिक यांसह अनेक मान्यवर हजर असल्याचे दिसून येत आहे. 

मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वीच दिली होती माहिती

आयटीआयमध्ये मुलांना काळाशी सुसंगत तसेच नव्या उद्योगांची आवश्यकता पाहून प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कौशल्य विकास विभाग आणि विविध कॉर्पोरेट्स यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या या उपक्रमास राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिली होती. टाटा टेक्नॉलॉजी आणि इतर कॉर्पोरेट संस्थांच्या सहयोगातून राज्यातील 419 शासकीय आयटीआय आणि 53 टेक्निकल स्कूल्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

Read in English

Web Title: 419 ITI colleges in the state will be transformed, only Tata will come to the rescue, sharad pawar tweeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.