मुंबईत ४१९ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:37+5:302021-09-21T04:07:37+5:30
मुंबई : मुंबईत सोमवारी ४१९ रुग्णांची नोंद झाली असून, पाचजणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४४७ रुग्णांना डिस्चार्ज ...
मुंबई : मुंबईत सोमवारी ४१९ रुग्णांची नोंद झाली असून, पाचजणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ३८ हजार ५२४ वर पोहोचली असून, मृतांची संख्या १६ हजार ५८ वर पोहोचली आहे. शहर उपनगरात रुग्ण बरे होण्याची संख्या सात लाख १५ हजार ३९४ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.
मुंबईत १३ ते १९ सप्टेंबरपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के असल्याची नोंद आहे. शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १ हजार १९४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतील चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. ४१ इमारतींत रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ३१ हजार ८६०, तर आतापर्यंत एकूण ९९ लाख ९३ हजार ८६३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
चौकट
३७३ गंभीर रुग्ण
शहर उपनगरातील सक्रिय रुग्णांपैकी ३७३ रुग्णांची प्रकृती पालिकेच्या डॅशबोर्डवर नमूद आहे, तर २ हजार ८३ रुग्ण लक्षणविरहित असून, २ हजार १७३ रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणे आहेत.