मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ४१वा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. तानसा-२ या रॉबिन्स बनावटीच्या टनेल बोरिंग मशीनद्वारे महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक हा डाऊन-लाईन मार्गाचा ८३२.५ मी. भुयारीकरणाचा टप्पा एकूण ५५५ रिंग्सच्या साहाय्याने २६३ दिवसात पूर्ण करण्यात आला.
“कुलाबा ते सीप्झ पर्यंत मेट्रो-३ कॉरिडॉरचा संपूर्ण डाऊनलाइन भुयार पूर्ण झाल्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आणखी एक टप्पा लाइन ३ च्या १००% भुयारीकरणाच्या पूर्णतेच्या प्रतीक्षेत आहे”, श्री. एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एम.एम.आर.डी.ए आणि व्यवस्थापकीय संचालक, मुं.मे.रे.कॉ.
मेट्रो-३ मार्गिकेतील पॅकेज-३ मध्ये पाच स्थानके असून हा या मार्गिकेतील सर्वात लांब टप्पा आहे. या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्यूझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत पाच भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत.पॅकेज-३ च्या भुयारीकरणाचा तपशील पुढील प्रमाणे:-१) सायन्स म्यूझियम ते वरळी (अप लाईन- २०७२ मी, डाऊन लाईन- २०५७ मी)२) सायन्स म्यूझियम ते महालक्ष्मी (अप लाईन- १११७.५ मी, डाऊन लाईन-११३५.५ मी)३) महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल (डाऊन लाईन- ८३२.५ मी.)
मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५३.७८ कीमी म्हणजेच ९८.६०% भुयारीकरण पूर्ण झाले आहे.