Join us

राज्यातील ४२ टक्के शिक्षक अजूनही लसीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळा सुरु करण्याची मागणी जोर धरत असताना राज्यातील अद्याप १ लाख ४९ हजार ७०५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शाळा सुरु करण्याची मागणी जोर धरत असताना राज्यातील अद्याप १ लाख ४९ हजार ७०५ शिक्षकांचे लसीकरण झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकांना लसीकरणात प्राधान्य मिळावे, अशी मागणी वारंवार करूनही शिक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अद्यापही १ लाख ८४ हजार ९८२ शिक्षक दुसऱ्या लसीच्या प्रतीक्षेत आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे तरी कसे, हा प्रश्न पालकांपुढे उभा ठाकला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षक दिनापूर्वी देशातील शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, शिक्षण विभागाकडून १४ सप्टेंबर रोजी राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील पर्यवेक्षकीय यंत्रणांना तातडीचे आदेश देत विशेष लिंक तयार केली. केंद्रप्रमुखांनी ही माहिती तत्काळ ऑनलाईन भरावी, असे आदेश देण्यात आले. या आधी जिल्हास्तरीय शिक्षण विभागांकडेही शिक्षक लसीकरण माहिती अपडेट नसल्याने एका दिवसात माहिती देण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. संकलित करण्यात आलेल्या माहितीवरून राज्यातील ४ लाख ५२ हजार शिक्षकांचे पूर्ण लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षकांना प्राधान्य नाहीच

लसीकरणात शिक्षकांना प्राधान्य द्यावे, त्यांच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या वारंवार विविध संघटनांकडून शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शाळा सुरु करण्यासाठी केवळ मार्गदर्शक सूचना देऊन उपयोग नाही तर लसीकरणात शिक्षण विभागाने आवश्यक नियोजन करायला हवे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

----------------

कोणत्या जिल्ह्यात किती लसीकरण?

जिल्हा - पहिला डोस - दुसरा डोस - लसीकरण न झालेले

मुंबई - २४३५४- २७२५६ - १२९३६

ठाणे - १०६३५ - २१५९४ - १७६७०

रायगड- ४५७८ - १३४२८ - ८८०१

पालघर - ४०२२ - १२०३३ - १५४४

पुणे - १०५२२ - २९७०४ - १२९०

सोलापूर - ७३४३ - २६३५२ - ३१८३

अहमदनगर - ७५२५ - १४१३४ - २११८

नाशिक - ४१२७ - १४८८५ - १६९७७

नंदुरबार - ३६४ - १०२१० - ५५

जळगाव - ४१०६ - ९७३७ - १२०६५

धुळे- १६१४ - २०६७० - ६३९

कोल्हापूर - १३७८८ - ७२१८ - १८२८

रत्नागिरी - २१०९ - १०८०९ - ५५६

सिंधुदुर्ग - ३०५९ - ४१८८ - २७१

सांगली - १४८८५ - ५१७८ - १५१२

सातारा - १०४४ - १९२२७ - १०६७

औरंगाबाद - ५०६८ - २१२९१ - ६६७२

हिंगोली - ३४२८ - ९५१५ - ४४७

जालना - १४१५ - ७६७६ - ५२०२

परभणी - ३०५ - ६५२ - १३४०८

बीड - ४४२८ - १७९२७ - ४२९५

नागपूर- १०४७९ - १७०७८ - ३३४३

गडचिरोली- १३७६ - ७१२३ - ४४९

गोंदिया- ० - ८७९२ - ८५४

वर्धा- १८५२ - ६६२० - ३१०

चंद्रपूर - ३७२५ - १३५०५ - ६५५

भंडारा - २३२० - ६३५६ - २५३

अमरावती - ७१४ - ९२५० - ६९८७

वाशीम - ३०१९ - ८५०४ - १३६५

यवतमाळ - ५१०४ - १९८५१ - ९२३२

बुलढाणा - २४३९ - १२०५५ - २५४२

अकोला- ६८१४ - ५५७२ - २४१९

लातूर - ७५१३ - १५६६४ - ९७४

उस्मानाबाद - ५५६९ - ५५८१ - १४२३

नांदेड - ५३३९ - १२५७९ - ६३५३

एकूण ० १८४९८२ - ४५२२१४ - १४९७०५

**********

५७ टक्के शिक्षकांचे लसीकरणाचे दोन्ही टप्पे पूर्ण

४० टक्क्यांहून अधिक शिक्षक लसीकरणाच्या प्रतीक्षेत

---

शिक्षकांच्या लसीकरणाची मार्कशीट

एकूण शिक्षक - ७,८८,५१८

पहिला डोस पूर्ण - १,८४,९८२

दोन्ही डोस पूर्ण - ४,५२,९१४

एकही डोस न घेतलेले - १,४९,७०५