राज्यात दिवसभरात ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:07 AM2021-05-25T04:07:19+5:302021-05-25T04:07:19+5:30
मुंबई : राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात सोमवारी २२ हजार १२२ ...
मुंबई : राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात सोमवारी २२ हजार १२२ रुग्ण आणि ३६१ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर, दुसरीकडे दिवसभरात ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर १.५९ टक्के आहे. सध्या राज्यात ३ लाख २७ हजार ५८० रुग्ण उपचाराधीन आहेत, त्यात पुण्यात ४८,२५८, मुंबईत २८,२९९, ठाण्यात २४,३३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३२ लाख ७७ हजार २९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.८३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २७ लाख २९ हजार ३०१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २४ हजार ९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख २ हजार १९ असून मृतांचा आकडा ८९ हजार २१२ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३६१ मृत्यूंपैकी २७५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ८६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ३६१ मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे २, नवी मुंबई मनपा ५, पालघर ७, रायगड ३, पनवेल मनपा ४, नाशिक १६, नाशिक मनपा १३, अहमदनगर १७, अहमदनगर मनपा ५, जळगाव ६, जळगाव मनपा १, नंदुरबार ३, सोलापूर १४, सोलापूर मनपा १, सातारा ९, कोल्हापूर २६, कोल्हापूर मनपा ३, सांगली ८, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग १२, रत्नागिरी ९, औरंगाबाद १, परभणी ८, परभणी मनपा १, लातूर ४, लातूर मनपा १, उस्मानाबाद ३, बीड २२, नांदेड ६, नांदेड मनपा १, अकोला २, अमरावती १७, अमरावती मनपा ४, यवतमाळ १६, वाशिम २, नागपूर १, नागपूर मनपा २, वर्धा ६, भंडारा १, चंद्रपूर १३, चंद्रपूर मनपा ७, गडचिरोली ११ इ. रुग्णांचा समावेश आहे.
राज्य
आजचा मृत्यूदर १.५९
आजचे मृत्यू ३६१
आजचे रुग्ण २२,१२२
सक्रिय रुग्ण ३,२७,५८०
मुंबई
आजचा मृत्यूदर ४.५
आजचे मृत्यू ४८
आजचे रुग्ण १०५७
सक्रिय रुग्ण २८०८६