राज्यात ४२ हजार ५८२ रुग्ण, तर ८५० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 AM2021-05-14T04:06:57+5:302021-05-14T04:06:57+5:30

मुंबई : राज्यात गुरुवारी ४२ हजार ५८२ रुग्ण आणि ८५० मृत्यूची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण ...

42 thousand 582 patients and 850 deaths in the state | राज्यात ४२ हजार ५८२ रुग्ण, तर ८५० मृत्यू

राज्यात ४२ हजार ५८२ रुग्ण, तर ८५० मृत्यू

Next

मुंबई : राज्यात गुरुवारी ४२ हजार ५८२ रुग्ण आणि ८५० मृत्यूची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५२ लाख ६९ हजार २९२ झाली असून, मृतांचा आकडा ७८ हजार ८५७ झाला आहे. सध्या ५ लाख ३३ हजार २९४ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ४६ लाख ५४ हजार ७३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३४ टक्के असून, मृत्यूदर १.५ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३ लाख ५१ हजार ३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख २ हजार ६३० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २८ हजार ८४७ संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title: 42 thousand 582 patients and 850 deaths in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.