राज्यात ४,२६८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:25 AM2020-12-12T04:25:01+5:302020-12-12T04:25:01+5:30
मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४ हजार २६८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ७२ ...
मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४ हजार २६८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ७२ हजार ४४० इतकी झाली आहे. तर, दिवसभरात २ हजार ७७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७३ हजार ३१५ ॲक्टिव्ह रुग्ण राज्यात आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४६. टक्के एवढे झाले आहे, तर मृत्युदर २.५७ इतका आहे. आज दिवसभरात ८७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५९ लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख ७० हजार १३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ७२ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ही टक्केवारी १६.१८ इतकी आहे. सध्या राज्यात ५ लाख ३२ हजार २८८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार १२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.