विमानवारीसाठी ४.२९ कोटींचा खर्च

By admin | Published: February 19, 2015 02:14 AM2015-02-19T02:14:46+5:302015-02-19T02:14:46+5:30

विकासासाठी हजारो प्रकल्प हाती घेणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासनाने अभ्यास दौऱ्याच्या निमित्याने विमान दौऱ्यावर ४.२९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

4.29 crores cost for the airline | विमानवारीसाठी ४.२९ कोटींचा खर्च

विमानवारीसाठी ४.२९ कोटींचा खर्च

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी हजारो प्रकल्प हाती घेणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासनाने अभ्यास दौऱ्याच्या निमित्याने विमान दौऱ्यावर ४.२९ कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे मंत्री, मुख्य सचिव, नगरविकास सचिव, पालिका
आयुक्त, बेस्ट महाव्यवस्थापक व मंत्र्याच्या खाजगी सचिवांनी सुद्धा परदेशी नेत त्यांच्या दौऱ्यावरही कोट्यवधी खर्च केले आहेत.
१ एप्रिल २००१ पासून दिनांक ३१ मार्च २०१४ पर्यंत देशांतर्गत ६२६ स्थानी बैठक, अभ्यास आणि अन्य कारणासाठी प्रवास करत १ कोटी ४२ लाख ३८ हजार ४३१ रुपये खर्च करण्यात आले आहेत. परदेशात ३९ स्थानी करण्यात आलेल्या विमानवारीवर २ कोटी ८६ लाख ३५ हजार ३०३ रुपये खर्च झाले आहेत. अथक सेवा संघाचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितलेल्या माहितीतून ही माहिती उघड झाली आहे. (प्रतिनिधी)

१३ ते २६ नोव्हेंबर २००५ मध्ये मलेशिया, चीन, कॅनडा, यूएस, जपान, शांघाय, टोकियो व टोरंटो दौऱ्यासाठी ४९ लाख १८ हजार
५४७ रुपये खर्च करण्यात आले.

शहरी नियोजन, वाहतूक व मालवाहतुक आणि शहरी विकास यासाठी ४९ लाख ७ हजार ६८७ कोटी खर्च करण्यात आले.

यूएस, मलेशिया आणि सिंगापुर
येथील विमानवारीवर ४३ कोटी ३४ हजार १७७ रुपये खर्च करण्यात आले.
राहुल अस्थाना, अश्विनी भिडे यांच्या २४ ते २६ नोव्हेंबर २०११ दरम्यान लंडन दौऱ्याला २० लाख ३४ हजार ५१७ रुपये खर्च ,वॉशिंग्टन, लंडन वाहतूक फोरम व अभ्यास दौऱ्यावर
१९ लाख ९८ हजार ८३६ खर्च झाला आहे.२००२ साली ८ दिवसांच्या दौऱ्याला ५ लाख ७३ हजार ७९४ रुपये सर क्वाललंपूर, बँकॉक आणि सिंगापूर दौऱ्यावर ७ लाख ६६ हजार ४६० खर्च

Web Title: 4.29 crores cost for the airline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.