३ तासांत ४३ फरारी आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:06 AM2021-09-13T04:06:16+5:302021-09-13T04:06:16+5:30
मुंबई : मुंबई पोलिसांनी राबविलेल्या ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत तीन तासांत ४३ फरार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २०८ ...
मुंबई : मुंबई पोलिसांनी राबविलेल्या ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत तीन तासांत ४३ फरार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २०८ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील ९४३ आरोपी तपासण्यात आले. त्यामध्ये २७७ आरोपी मिळून आले.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. यात पाचही प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, १२ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत गुन्हेगारांची धरपकडीबरोबर अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राबविलेल्या ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत पोलिसांनी तीन तासांत ४३ फरार आरोपींना जेरबंद केले आहे. २०८ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील ९४३ आरोपी तपासण्यात आले. त्यामध्ये २७७ आरोपी मिळून आले. ड्रग्स विरोधात अमली पदार्थ विरोधी पथकाने १०३ जणांवर कारवाई केली. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकूण १५ जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, तसेच अजामीनपात्र वॉरंटमधील एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
....
आरोपीसाठी २५/५० चा फॉर्म्युला
मुंबईत गुन्हेगारी वृत्तीला आवर घालण्यासाठी मुंबई पोलिसांकड़ून प्रत्येक पोलीस ठाण्यातील टॉप २५ सराईत गुन्हेगारांची यादी काढण्यात आली. या गुन्हेगारांकड़ून पुन्हा गुन्हा करणाऱ नाही, यासाठी बॉन्ड लिहून घेण्यात येत आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या दंडाची रक्कम ५० लाखांपर्यंत आहे. यापूर्वी ५ हजार रुपये दंड होता. मात्र, रक्कम कमी असल्याने याकडे दुर्लक्ष होत होते.
.....
३,०४३ गुन्हेगारांची यादी...
मुंबईतल्या सर्व पोलीस स्टेशनमधील ३,०४३ गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली आहे. करारामधील रकमेची तरतूद बॉण्ड भरणाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असणार आहे.